आम्ही मानतो कि प्रत्येक गृहिणीमध्ये काही ना काही कौशल्य असतेच जे तिला तिची स्वतःची एक नवी ओळख निर्माण करून देऊ शकते... तेच स्पेशल कौशल्य शोधण्यासाठी आणि त्याचे कामामध्ये, व्यवसायामध्ये रूपांतर करून तिला स्वावलंबी करण्यासाठी स्वयंपूर्णा फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. कोणत्याही होतकरू महिलेला सहानुभूती पेक्षा संधी हवी असती, ती कुठल्याही बाबतीत मागे नसते, गरज असते तर फक्त तिला लढ म्हणण्याची.. आणि तेच काम आम्ही स्वयंपूर्णा फाऊंडेशन मध्ये करतोय.
सविस्तर माहितीमुलं बाहेर शिकायला, कामाला असतील तर प्रत्येक आईला भेडसावणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे त्यांना रोज घरचं जेवण न मिळण्याचा. त्यांचे बाहेरचं खाऊन पोट न भरणे आणि वारंवार आजारी पडणे या समस्येवर अनेकांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र म्हणावं असा फरक पडला नाही. शेवटी आता प्रत्येक आई, प्रत्येक घरातील गृहिणीनी एकत्र येत आहेत आणि प्रत्येकाचा घरच्या खाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवत आहेत. कसं हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा.
बाजूच्या घरातून प्रत्येकाला हेल्दी आणि टेस्टी जेवण देणारा, प्रत्येक आईनं पुढाकार घेऊन बनवलेला